Chandrakant Bhanji Chande Memorial Trust’s Project Ehsaas Matimand Mulanche Balgruh

  +91 836 933 0780  Valase Village, NH4 Highway,Satara - 415003



Homeएहसास मतिमंद मुलांच्या बालगृहात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आलेUncategorizedएहसास मतिमंद मुलांच्या बालगृहात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले

एहसास मतिमंद मुलांच्या बालगृहात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले

🚩🚩आज आषाढी एकादशीच्या पावन निमित्ताने शुक्रवार, दिनांक २४ जुलै २०२६ रोजी “एहसास मतिमंद मुलांच्या बालगृहात आषाढी एकादशीनिमित्त भक्तिमय दिंडी सोहळ्याचे उत्साहात आयोजन करण्यात आले. विठ्ठल नामाच्या गजरात मुलांनी आनंदाने सहभाग घेतला.” “भक्ती, संस्कार आणि आनंदाचा संगम… बालगृहात दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करून विशेष मुलांनी विठ्ठलभक्तीचा आनंद अनुभवला. दिंडीत विद्यार्थ्यांनी विठ्ठल, रुक्मिणी, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, माऊली, वारकरी, वीणेकरी तसेच वारकरी संप्रदायाशी संबंधित विविध आकर्षक वेशभूषा परिधान करून उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांच्या या मनमोहक सादरीकरणामुळे दिंडीला विशेष आकर्षण प्राप्त झाले.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *